Farmer Karj Mafi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने खूपच आनंदाची बातमी समोर आणली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण देखील झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि त्यांना ते कर्ज वेळेवर फेडता आले नाही. यामुळे त्यांच्या कर्जावर व्याजदर वाढत राहिले. आणि आता त्यांच्यावर एवढा आर्थिक बोजा झाला आहे की, ते शेतकरी कर्जाची परतफेड करूच शकत नाहीत. यामुळे आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे.
कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
अनेक शेतकरी त्यांच्या शेतात पीक घेण्यासाठी येणाऱ्या हंगामात होणारा खर्च पाहता आर्थिक बोजा पडू नये यासाठी सरकारी बँकेकडून कर्ज घेत असते. तसेच अनेक वेळा दुष्काळी परिस्थिती, पूर परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक नुकसानामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जाची परतफेड करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज वाढत जाते. आणि त्यानंतर अशी परिस्थिती येते की त्या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे खूपच अवघड होऊन जाते. यामुळे सरकार आता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.Farmer Karj Mafi
ही एक शेतकऱ्यांसाठी खूपच चिंतामुक्त करणारी बातमी आहे. सर्व शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीक पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला कोठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर थकबाकी भरण्याची अटही सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. यामुळेही शेतकऱ्यांना लाखमोलाचा दिलासा मिळाला आहे.
30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज शेतकऱ्यांचे माफ होणार आहे. याबाबतचा सरकारने निर्णय देखील घेतला आहे. तसेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य शासन थेट कर्जमुक्तीची रक्कम भरणार आहे.
राष्ट्रीयकृत,ग्रामीण बँक आणि व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ केल्या जाणार आहे. यामुळे हा एक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार नाही याबाबत अधिकृत माहिती तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. तसेच कोणत्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Farmer Karj Mafi
येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार?